Posts

Showing posts from August, 2017

बंदीशाळा

देशप्रेमाने आंधळे झालेल्यांच्या आणि सत्तेच्या धुंदीत असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या पावलांनी जगाला उत्कर्षाच्या दिशेनं घेऊन जाणं केवळ अशक्यच. त्या अविवेकी अंधकारात प्रकाशाची आशा करणंही मुर्खपणाच ठरेल. जगातली आजची दृश्यं येऊ घातलेल्या अस्थिरतेची पूर्वसूचनाच आहे. वर्तमान घडामोडींवरील हे भाष्य अभूतपूर्व नाहीये. आजूबाजूचे बदल आपण प्रतिक्षण पाहतोच आहोत. पण या बंदीशाळा बनू पाहत असलेल्या जगात स्वतंत्र विचारांची निर्भय मनं असल्याचं पाहून उमेद येते. असो. नानाविध प्रश्नांनी वेढलेलं हे जग आज उत्तरं शोधण्यास मात्र असमर्थ ठरत आहे, त्यामुळे प्रदूषण, दहशतवाद, प्रांतवाद, युद्ध याहीपेक्षा मोठी काहीशी विकृत आणि कदाचित या सर्व समस्यांची जननी म्हणजे जगाचे तथाकथित 'असामान्य' चालक आणि त्यांची संकुचित वैचारिकता. ही संकुचितता सामान्यांना गुदमरायला लावते आणि घुसमट असह्य झाली की विवेक बळी पडतो आणि उरतं एक गुलाम मन. खरंतर जनतेचं सामान्य असणं हेच त्या अतिमहत्वाकांक्षी सत्ताधाऱ्यांच्या 'असामान्य' बनण्याचं भांडवल आहे. त्यांच्या त्या तोकड्या दृष्टीकोनातून पाहिलं तर सामान्य असणं म्हणजे माणूस नसणंच आहे. य...